Saturday, 14 October 2017

पुणतांब्यात नव्या क्रांतीची तयारी, शेतकरी गावरान वाणाची पेरणी करणार

पुणतांब्यात नव्या क्रांतीची तयारी, शेतकरी गावरान वाणाची पेरणी करणार


बलिप्रतिपदा या बळीराजाच्या सणाला म्हणजेच 20 ऑक्टोबरला पूणतांब्यात शेतकरी जनजागृती मेळाव्याच आयोजन करण्यात आलं आहे. हायब्रीड वाण आणि रासायनिक खतांचा वापर न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात येणार आहे.
 शेतकरी संपाची मशाल पेटवणाऱ्या पुणतांब्यातून आता नवीन क्रांतीची तयारी सुरु झाली आहे. सरकारला काही द्यायचं नाही आणि सरकारकडे काही मागायचं नाही. हायब्रीड वाण आणि रासायनिक खतांचा वापर न करता गावरान वाणाची पेरणी करायची. उत्पादन कमी करुन उत्पन्न वाढवायचे अशा प्रकारची भूमीका घेऊन राज्यातील शेतकऱ्यांची जनजागृती केली जाणार आहे.बलिप्रतिपदा या बळीराजाच्या सणाला म्हणजेच 20 ऑक्टोबरला पूणतांब्यात शेतकरी जनजागृती मेळाव्याच आयोजन करण्यात आलं आहे. हायब्रीड वाण आणि रासायनिक खतांचा वापर न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात येणार असून गावरान वाण लावून आपला हमीभाव आपणच ठरवा अशा प्रकारची नवी भूमीका मांडण्यात घेऊन एक नवे जनआंदोलन उभारण्यात येणार आहे.सरकारकडून मदत मिळत नाही तर शेतकऱ्यानेही आता सरकारला मदत करायची नाही. सरकारला विकास करायचा असेल तर शेतकऱ्याची जमीन लागते. मात्र याच शेकतऱ्याला आश्वासनाशिवाय काहीच पदरी पडत नाही. त्यामुळेच आता अशा प्रकारची ही नवी भूमीका घेऊन येत्या 20 तारखेला किसान क्रांतीच्या वतीने पुणतांब्यात जनजागृती मेळावा घेऊन करणार सुरवात होणार आहे.आता राज्यातील शेतकरी या नव्या भूमिकेला किती पांठिबा देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

INDRAPRASTH AGRO TECH

महाराष्ट्रामध्ये शेती पर्यटन केंद्रांची संलग्नीकरण साठी मार्गदर्शक तत्वे ; कृषी पर्यटन केंद्रे ; अर्ज कुठे करायचा ? माहीतीसह

कृषी पर्यटन केंद्रे

शहरी वातावरणात वाढणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना आपण खातो त्या भाज्या कशा निर्माण होतात, फळांची झाडे कशी असतात, दूध कोठून मिळते याचबरोबर शेतीविषयक विविध बाबींबाबत मोठे कुतूहल असते. शेती हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. अनेक सण, उत्सव, परंपरा या शेती व्यवसायाशी निगडित आहेत. ग्रामीण शेती, संस्कृती, लोकजीवन, उत्सव, खाद्यसंस्कृती इत्यादींची शहरवासीयांना निसर्गरम्य वातावरणात ओळख व्हावी यासाठी कृषी पर्यटन उत्तम पर्याय ठरतो. ग्रामीण भागात कृषी पर्यटनाची मोठी संधी निर्माण झाली आहे. राज्यात विविध ठिकाणी कृषी पर्यटन केंद्रे उभारली आहेत.
शेती हा देशाच्या व राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कारण देशातील 70 टक्के तर राज्यातील 55 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या आपल्या चरितार्थासाठी थेट शेती व्यवसायावर अवलंबून आहे. महाराष्ट्र राज्यात असलेले जवळपास 82 टक्के कोरडवाहू क्षेत्र, 52 टक्के अवर्षणप्रवण क्षेत्र, 40 टक्के हलक्या जमिनीचे क्षेत्र, अनियमित पाऊस, अतिवृष्टी, अवर्षण, गारपीट, कृषी मालाच्या बाजार भावातील अनपेक्षित चढ-उतार, पायाभूत सुविधांची कमतरता यासारख्या विविध समस्या शेती व्यावसायिंकासमोर आहेत.
या पार्श्वभूमीवर शेती व्यवसायातून उत्पन्नात स्थिरता प्राप्त करण्याच्या दृष्टीने शेतकरी आतापर्यंत पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यशेती व विविध प्रकारचे कुटीरोद्योग करायचे. नव्या पिढीला मात्र शेतीविषयक विविध बाबींबाबत मोठे कुतूहल असते. शेती हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. अनेक सण, उत्सव, परंपरा या शेती व्यवसायाशी निगडित आहेत. अशा परिस्थितीत ग्रामीण शेती, संस्कृती, लोकजीवन, तेथील रुढी, परंपरा, उत्सव, जत्रा, खाद्यसंस्कृती, लोककला इत्यादी विविध बाबी पाहणे, त्यांची अनुभूती घेणे व आपल्या मुलांना त्याचा अनुभव देणे हे त्यांना आवडते. शहरी वातावरणात कंटाळलेले युवकयुवती देखील मनाला शांतता लाभावी, निसर्गरम्य वातावरणात जावे म्हणून देखील ग्रामीण भागातील असा अनुभव देणाऱ्या कृषी पर्यटन केंद्राच्या शोधात असतात.
या पार्श्वभूमीवर कृषी पदवी, अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन व इतर क्षेत्रातील अभ्यासक्रम पूर्ण केलेले अनेक युवक/युवतींनी शहरी भागातील ही गरज ओळखून राज्यात विविध ठिकाणी कृषी पर्यटन केंद्रे उभारली आहे.

महाराष्ट्रामध्ये शेती पर्यटन केंद्रांची संलग्नीकरण साठी मार्गदर्शक तत्वे
कृषी पर्यटनासंबधी मार्गदर्शक तत्वे


१) अर्ज कुठे करायचा ? माहीतीसह अर्ज पुढील पत्त्यावर समक्ष देता येईल :
अध्यक्ष
महाराष्ट्र अॅग्री अँण्ड रुरल टुरिझम को - ऑप. फेडरेशन लि.(मार्ट),पुणे
४३४, शुक्रवार पेठ, अनुश्री हाईटस् १ ला मजला,
शिवाजी रोड, पुणे -४११००२.

२)कृषी पर्यटन केंद्राने संलग्नीकरणसाठी अर्ज करताना पुढील नमुन्याप्रमाणे, योग्य त्या कागदपत्रांसह माहिती देणे आवश्यक आहे.
(अ) नमुना अर्ज: अॅनेक्शर I प्रमाणे,
(ब) सुख - सोयींची यादी, अॅनेक्शर II प्रमाणे,
(क) जाहीर निवेदन, अॅनेक्शर III प्रमाणे,
(ड) मान्यता : स्वीकारपत्र अॅनेक्शर IV प्रमाणे,
(इ) पोलिस तपासणी : अॅनेक्शर V प्रमाणे .

३)संलग्नीकरण फी रु. 5,000 + 5,000(तीन दिवसाच्या प्रशिक्षण शिबीरासाठी जे बंधनकारक आहे.)/- महाराष्ट्र स्टेट अॅग्री अँण्ड रुरल टुरिझम को - ऑप. फेडरेशन लि.(मार्ट),पुणे या नावे डिमांड ड्राफ्ट (पुण्यातील शाखेवर देय)काढून पाठवावी. किंवा रोख रक्कम थेट PDCC बँकेत, डेक्कन जिमखाना बी.आर. पुणे येथे जमा करावी. IFS CODE: HDFCOCPDCCB A/C No. 1/92.
४) कृषी पर्यटन केंद्राची संलग्नीकरण करण्यासाठी शेती पूर्णपणे विकसित झालेली असावी. तसेच ती शेती पर्यटकांना भेट देण्यास योग्य अशा ठिकाणी असली पाहिजे.
५) भाडयाने देण्यासाठी कमीत कमी ३ खोल्या असणे हे कृषी पर्यटन केंद्राची संलग्नीकरण करण्यासाठी बंधनकारक आहे.
६) करारपत्रावर सही झाली, की त्या तारखेपासून प्रथम ३ वर्षासाठी संलग्नीकरण होते. मार्ट संस्थेच्या तपासणी समितीने / पुनर्वालोकन समितीने शिफारस केली तर त्याची मुदत वाढवली जाऊ शकते. या संदर्भात व्यवसाय किती प्रमाणात वाढला आहे, पर्यटकांची संख्या, कृषी पर्यटन केंद्राची देखभाल इ. बाबींचा विचार करण्यात येतो.
७) पर्यटकांच्या भेटीचे रजिस्टर (नोंद) ठेवणे आणि त्यामध्ये पाहुण्यांचा अभिप्राय घेणे बंधनकारक आहे. हे रजिस्टर दर महिन्याला मार्ट संस्था, पुणे येथे पाठवणे बंधनकारक आहे.
८) कृषी पर्यटन केंद्रामध्ये पर्यटकांचा मुक्काम असताना कोणत्याही स्वरूपाचा अपघात झाला तर त्याला ताबडतोब वैद्यकीय मदत करणे आणि वाहन व्यवस्था करणे ही शेतकऱ्याची / कृषी पर्यटन केंद्राची जबाबदारी राहील. अशा प्रकारची जबाबदारी स्विकारण्याचे मान्यताप्राप्त (अॅफ़िडेव्हीट) शेतकऱ्याने संलग्नीकरण करतेवेळी देणे बंधनकारक आहे.
९) शेतकऱ्याविरूद्ध कोणत्याही स्वरूपाची तक्रार आली तर मार्ट संस्था संबधित केंद्राची संलग्नीकरण रद्द करण्याचा अधिकार मार्ट संस्थेला आहे.
१0) सोबतच्या सूचीप्रमाणे सुखसोयी आणि सेवांची उपलब्धता याबाबत तपासणी व मुल्यांकन केले जाईल. (सूची पूर्ण भरून आणि कागदांवर सही करून मार्ट संस्थेकडे सादर केलीच पाहिजे)
११) मार्ट संस्थेची समिती कृषी पर्यटन केंद्राची तपासणी करेल, आणि नंतर त्यांच्या संलग्नीकरणबाबत शिफारस करेल. त्यानंतर विशिष्ट कालावधीनंतर, वेळोवेळी देखरेख ठेवण्यासाठी तपासणी करण्यात येईल. त्यावरून केंद्राच्या प्रगतीचा अहवाल सदर केला जाईल.
१२) मार्गदर्शक तत्वे / अटी आणि नियम यामध्ये वेळोवेळी बदल करण्याचे हक्क मार्ट संस्थेने, स्वतःकडे राखून ठेवले आहेत.
१३) सर्व प्रकारचे दर आणि विविध कर (इलेक्ट्रिसिटी वीज, पाणी, स्थावर वास्तू आणि करमणूक इ. संदर्भात ) यांची सर्व आणि पूरक जबाबदारी शेतकऱ्याची असेल तसेच या सर्व जबाबदाऱ्या त्याने पूर्ण करणे आवश्यक आहे. ह्या जबाबदाऱ्यांबाबत मार्ट संस्था कोणत्याही प्रकारची सवलत / माफी देण्याविषयी आश्वासन देऊ शकत नाही.
१४) शेतकऱ्याने मार्ट संस्थेचे नाव किंवा बोधचिन्ह विदयुतपाटी (साईन बोर्ड ) कोणत्याही प्रकारे प्रदर्शित करू नये. तसेच छापील प्रसिद्धी पत्रके, रोखीच्या - चेकच्या पावत्या, लेटर हेड्स, रबर स्टेम्प्स इ. बाबींसाठी सुध्दा मार्ट संस्थेच्या नावाचा आणि बोधचिन्हचा वापर करू नये. या अटींचा भंग झाल्यास संलग्नीकरण / मान्यता रद्द होऊ शकते.
१५) मार्ट संस्थेकडून केंद्राला संलग्नीकरणचे प्रमाणपत्र देण्यात येईल. हे प्रमाणपत्र स्वागतकक्ष / कार्यालय येथील दर्शनी भागात लावल्यास हरकत नाही. तसेच विदयुत बोर्डावर (साईन बोर्डावर ) किंवा इतर छापील साहित्यावर मात्र 'मार्ट संस्था ' व्दारे संलग्नीकरणकृत " Registred With Mart " असा उल्लेख शेतकरी करू शकेल.
१६) शेतकऱ्याने दरपत्रकात कोणताही बदल केला असेल किंवा पर्यटनाच्या दृष्टीकोनातून काही नवीन योजनांचा समावेश केला असेल तर त्या सर्वांची माहिती मार्ट संस्थेला कळविली पाहिजे.
१७) कृषी पर्यटन केंद्र संचालकाने विहित नमुना अर्जाप्रमाणे (अॅनेक्शर -V) पोलिस पडताळणी अहवाल (रिपोर्ट) सदर करणे बंधनकारक आहे.
१८) सरकारसंबधी खात्याचे/ प्रतिनिधी कंपन्यांचे नियम आणि अटी यांची काटेकोर अंमलबजावणी शेतकऱ्याने केलीच पाहिजे. कोणत्याही नियमांचा किंवा मार्गदर्शक तत्वांचा कोणत्याही प्रकारे भंग होणार नाही याची शेतकऱ्याने काळजी घ्यायला हवी. त्या संदर्भात धोरणात्मक भंग होणार नाही याची शेतकऱ्याने काळजी घ्यायला हवी. त्या संदर्भात धोरणात्मक भंग झाल्याचा परिणाम म्हणून जर त्या खात्यामार्फत कोणतीही कारवाई झाली तर तिला तोंड देण्याचे (सामोर जाण्याची ) पूर्ण जबाबदारी ही संबधित शेतकऱ्याची असेल.

१९) सोबत कागदपत्रे खालीलप्रमाणे आवश्यक
१) शेतजमिनीचा ७/१२ उतारा अथवा करारनामा
२) ग्रामपंचायत ना हरकत दाखला
३) पोलिस पाटलांचा दाखला.


अधिक माहितीसाठी संपर्क - INDRAPRASTH AGRO TECH

forty.square1948@gmail.com


कृपया संलग्नीकरण खालील फॉर्म भरा








 
अधिक माहितीसाठी संपर्क - INDRAPRASTH AGRO TECH

forty.square1948@gmail.com

कृषी पर्यटन केंद्रातील रेलचेल

बहुतांशी कृषी पर्यटन स्थळांमध्ये काही ग्रामीण वैशिष्ट्यांचा समावेश असतो. उदा.ग्रामीण लोककलांमध्ये भारुड, गोंधळ, जागरण, कीर्तन, वासुदेव, गारुड्याचा खेळ, डोंबाऱ्यांचा खेळ, लेझीम खेळणे इत्यादींचे प्रात्यक्षिक दाखवले जाते. पिकांमध्ये भात, बाजरी, गहू, मका, ज्वारी, तूर, मुग, उडीद, भुईमूग इत्यादी पिकांची लावणी, व्यवस्थापन, काढणी व वितरण बाबत माहिती, प्रत्यक्ष कार्यानुभव दिला जातो. याशिवाय हरितगृह, रोपवाटिका, आंबा, काजू, संत्रा, मोसंबी, द्राक्ष इत्यादी फळपिकांची लागवड, व्यवस्थापन, काढणी, प्रक्रिया व विपणनबाबत तसेच दुग्धव्यवसाय, पशूपालन, कुक्कुटपालन याबाबत माहिती व प्रत्यक्ष कार्यानुभव दिला जातो. नदी, ओढे, विहीर, शेततळे यामध्ये पोहणे इत्यादी साहस अनुभवता येते. याशिवाय स्थानिक हस्तकला-सुतार, लोहार, कुंभार, कोष्टी इत्यादी, साहसी पर्यटन संधी, स्मारके भेट, पक्षी निरीक्षण, धरणे, जलक्षेत्र, धार्मिक श्रद्धास्थाने, ऐतिहासिक किल्ले, गुंफा भेटी, द्राक्ष महोत्सव, फळपीक महोत्सव, धान्य महोत्सव भेटी, आठवडे बाजार, वाईनरी, गुऱ्हाळ, मधुमक्षिका प्रकल्प भेट, ग्रामीण जेवणाचा स्वाद-चुलीवर पिठलं, भाकरी, ठेचा, चपाती, चटणी, लोणची, दही, दूध, ताक, वांगे भरीत, हुरडा याची चव घेता येते. ग्रामीण यात्रा, महोत्सव, जत्रांमध्ये सहभाग नोंदवता येतो. ग्रामीण खेळांमध्ये सहभाग-बैलगाडी, ट्रॅक्टरमधून सफारी, घोड्यावरून रपेट, विटी-दांडू, हुतुतू, आट्या-पाट्या, गोट्या, सूरपारंब्या इत्यादी खेळांची ओळख करुन दिली जाते.

काही वैशिष्ट्यपूर्ण कृषी पर्यटन केंद्रे

1. पराशर कृषी पर्यटन केंद्र - राजुरी, ता.जुन्नर, जि.पुणे येथे मनोज हाडवळे या फलोत्पादन शाखेतील पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या तरुणाने ऋषी पराशर या कृषिविषयक पहिला ग्रंथ लिहिणाऱ्या ऋषींच्या नावे हे पर्यटन केंद्र सुरु केले आहे. याठिकाणी एका वेळेस 40 हून अधिक पर्यटकांची निवास सुविधा असून द्राक्ष, डाळिंब, वनपर्यटन, आठवडी बाजार, दुग्धव्यवसाय, डेअरी, लोककला व मासवडी-भाकरी सारखे पाटावर बसून घ्यावयाचे जेवण अशा विविध बाबी येथे उपलब्ध आहेत. मुंबईपासून साधारणत: 150 व पुणे-नाशिकपासून 110-120 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. (संपर्क : www.hachikotourism.in)

2. सगुणा बाग – नेरळ (ता.कर्जत,जि.रायगड) येथे चंद्रशेखर भडसावळे या कोकण कृषी विद्यापीठातून कृषीविषयक शिक्षण घेतलेल्या व अमेरिकेत जाऊन काही काळ काम केलेल्या कृषी पदवीधराने जवळपास 1995-96 मध्ये हे कृषी पर्यटन केंद्र सुरु केले आहे. या ठिकाणी शेततळ्यांमधील मत्स्यपालन, भातशेती, नारळ, आंबा, चिकूसारखी फळपिके आणि शेतीविषयक विविध भाजीपाला व इतर पिकांची लागवड आहे. या ठिकाणी ग्रामीण खेळांचा अनुभवदेखील आपण घेऊ शकतो. या पर्यटन केंद्रावर तळ्यामध्ये असलेले घर ही वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण येथून जेमतेम 15 ते 20 किमीपर्यंत आहे. आपण नेरळपर्यंत मुंबईहून लोकल रेल्वेने जाऊ शकतो. तेथून जेमतेम 6 किमी अंतरावर असलेल्या सगुणा बागेत प्रवाशांची नेण्या-आणण्याची व्यवस्था आहे. (संपर्क – www.sagunabaug.com)

3. तापोळा कृषी पर्यटन शेतकरी व्यावसयिक कंपनी – गणेश उत्तेकर व काही युवा प्रयोगशील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तापोळा या कोयना बॅक वॉटर असलेल्या महाबळेश्वर नजीकच्या ठिकाणी कृषी पर्यटन व्यावसायिक शेतकऱ्यांची कंपनी स्थापन केली आहे. या ठिकाणी कंपनीतील सभासद शेतकरी हे पर्यटकांचे राहणे, भोजन व स्थानिक कृषी पर्यटनाची सोय करतात (संपर्क : www.tapolatourism.com)

4. आनंद कृषी पर्यटन केंद्र - बोरगाव, (ता.जि.सातारा) येथे आनंद शिंदे या प्रयोगशील शेतकऱ्याने हे केंद्र उभारले असून या ठिकाणी मुलांसाठी रेनडान्स, लॉनवरील खेळ, साहसी क्रीडाप्रकार इत्यादी अनेक सुविधा आहेत. या ठिकाणी पाचगणी येथील शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहली ग्रामीण कार्यानुभवासाठी मोठ्या प्रमाणावर भेटी देतात. (संपर्क : www.anandagriturism.com)

5. पळशी कृषी पर्यटन केंद्र - पांडुरंग तावरे यांनी राज्यातील विविध कृषी पर्यटन व्यावसायिकांना कृषी पर्यटन विकास संस्थेच्या माध्यमातून एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कृषी पर्यटनात केलेल्या कामाबद्दल त्यांना राष्ट्रीय पर्यटन पुरस्कारासह अनेक देशांचे विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी उभारलेले पळशीवाडी (ता.बारामती, जि.पुणे) येथील पर्यटन केंद्र शहरी पर्यटकांची नाळ ग्रामीण भागाशी जोडण्याचे काम करत आहे.(संपर्क : www.agritourism.in)

6. एक अलौकिक अनुभव – कृषी पर्यटनातून मोठ्या प्रमाणात व्यावसायिक संधी निर्माण झाल्या असून राज्यात आजमितीस जवळपास 210 हून अधिक कृषी पर्यटन केंद्रात दरवर्षी जवळपास 8 लाखाहून पर्यटक भेटी देत असतात.

अधिक माहितीसाठी संपर्क - INDRAPRASTH AGRO TECH

forty.square1948@gmail.com


महाराष्ट्रातील कृषि पर्यटन केंद्र संपर्क क्र. माहिती -; कोकण विभागातील कृषि पर्यटन केंद्र संपर्क क्र. माहिती

ठाणे जिल्ह्यातील कृषि पर्यटन केंद्र संपर्क क्र माहिती


अन्नपूर्णा कृषि पर्यटन केंद्र
संपर्क -सौ. कल्पना गोपाळ अत्तरदे
मु. इंदगाव पो. वांगणी,
ता. अंबरनाथ जि.ठाणे
मो.नं :- ०२५१-२६०४२७३, ८३९०७९२५७२, ९७६७७५०७३१
ई-मेल :- bhaveshattrade1@gmail.com

निसर्ग किनारा कृषि पर्यटन केंद्र
संपर्क -श्री. चंद्रकांत पांडुरंग जोशी
मु. माउली फार्म मु.पोसरी,
ता. अंबरनाथ जि.ठाणे
मो.नं :- ९९२०६०३४१३, ९८२१२२७२३४

तुलसीज् अॅग्रो टुरिझम सेंटर
संपर्क -श्री.परेश तुळशीराम जोशी
सारंग बाग, मु. सावरे (भोई) पो. बदलापूर,
ता. अंबरनाथ जि.ठाणे
मो.नं :- ९९३०२२००५१
ई-मेल :- preshjoshi777@gmail.com

वैष्णवी सृष्टी कृषि पर्यटन केंद्र
संपर्क -अॅड. श्री. इंद्रजीत मु. ठाकूर
वैष्णवी फार्म, मु. मौजे केळणी पो. मामनोली,
ता. कल्याण, जि.ठाणे
मो.नं :- ९८१९३८९४४९
ई-मेल :- preshjoshi777@gmail.com

स्वरांगण कृषि पर्यटन केंद्र
संपर्क -अॅड श्री. अनंत कुंडलिक गायकर
मु.कोळींब पो.मामनोली,
ता. कल्याण, जि.ठाणे
मो.नं :- ९७०२३४४६४७, ९४२३३६०७६३
ई-मेल :- amantg5650@gmail.com

अनुराई इको टुरिझम केंद्र
संपर्क -श्री. मंगला मोरे सिंग
मु.पो. काजळविहीर ता. शहापूर,
जि.ठाणे
मो.नं :- ९९३०२२८६९६, ९८२०९५९५७२
http./facebook.comAnurayeeAgriTourism
वेबसाईट :- www.anurayeecotourism.in

दीर्घायु कृषी पर्यटन केंद्र
संपर्क -डॉ. सौ. आश्विनी प्रवीण कोटकर
मु. पो.खिरवाडी भातसा प्रकल्प रस्त्ता
ता. शहापूर , जि.ठाणे .

डिंगचॅक व्हीलेज कृषी पर्यटन केंद्र
संपर्क - श्री. मिलिंद पाठक
भादाणे फाटा, सरळगाव, किन्हवली रोड ,भादाणे,
ता. मुरबाड , जि. ठाणे .

देशमुख कृषी पर्यटन केंद्र
संपर्क -काराव, मु. पो. वांगणी,
ता. अंबरनाथ, जि. ठाणे .
विश्व कृषी पर्यटन केंद्र
केळवा बीच, सितळादेवी मंदिर जवळ ,
ता. पालघर , जि. ठाणे .

तारपा कृषी पर्यटन केंद्र
संपर्क - श्री. प्रभाकर सावे ,
मु. पो. तारपा , घोलवड (पूर्व ) ,
जि. ठाणे .

तुलसी'ज अग्रो टुरिझम सेंटर
संपर्क -श्री. परेश तुळशीराम जोशी
सारंग बाग,
मु. सावरे(भोई) पो. बदलापूर,
ता. अंबरनाथ ,जि. ठाणे

चिल कृषी पर्यटन केंद्र
संपर्क - श्री. वाणी
मु. पो. नंदोरे ,
ता. पालघर, जि. ठाणे .

मामाचा गाव कृषी पर्यटन केंद्र
संपर्क -श्री. ड्रिमी जयप्रकाश शाह
गुंदलेगाव , गोदावरी स्टोन क्रशरजवळ ,
भोईसर (पू ) ,
जि. ठाणे .
मो.नं. :- ०९८२३१८२२८०, ०२५०-२४३१९८९
=====================================

रायगड जिल्ह्यातील कृषि पर्यटन केंद्र संपर्क क्र माहिती


चव्हाण फार्मस कृषि पर्यटन केंद्र
संपर्क -श्री. सुभाष सदानंद चव्हाण
मु.पो. चव्हाण फार्मस बाईतवाडी कोलाड,
ता. रोहा जि. रायगड
मो.नं :- ९२२२२९९८९४, ९८२१५०२९५६, ९८२१०८९३७५
ई.मेल :- salilchawan2007@yahoo.co.in

हॉलीडे ईझलॅड अॅग्रो टुरिझम सेंटर
संपर्क -श्री. मनोहर विलास चोपडे
मु. स.नं.३४/३५ गोमेंडी, ता. महाड जि.रायगड
मो.नं :- ९४०३०९३०९५, ९४२२०९५०१४, ०२१४५-२२४५७६
ई.मेल :- chopadegroup@yahoo.in

कोकण कृषि पर्यटन केंद्र
संपर्क -सौ. योगिता मनोहर चोपडे
स.नं. ४०/४ मु.पो. वहूर पो. दासगाव
ता. महाड जि.रायगड
मो.नं :- ९४२२६९४०९०, ०२१४५-२२४७७६
ई.मेल :- chopdegroup@yahoo.in

ऋतुपर्ण कृषि पर्यटन केंद्र
संपर्क -सौ. सुनेजा प्र. गवाणकर
मु.पो. मोठे वेणगाव ता. कर्जत,
जि.रायगड-४१०२०१
मो.नं :- ९९६७६४८५५९
ई.मेल :- spgavankar@gmail.com

गारवा कृषी पर्यटन केंद्र
संपर्क - सौ. पोर्णिमा नाईक
पाणोसे कोड ता. माणगाव , ताम्हाणे घाट,
जि. रायगड.

सगुणा बाग
संपर्क -श्री. चंद्रशेखर ह. भडसावळे
भालेगाव मु. पो. नेरळ, ता. कर्जत
जि. रायगड – 410101.

अन्नपुर्णा फार्म कृषी पर्यटन केंद्र संपर्क -
मु. पो. टाकवे-कडाव ,
ता. कर्जत जि. रायगड पिन कोड – 410201

आमराई कृषी पर्यटन केंद्र
संपर्क - श्री. विक्रांत रविकांत चेळेकर
मु.पो.धनेघर बाग धामोते गाव नेरळ ,
ता. कर्जत जि. रायगड .
मो.नं. :- ९८१९४०११२२

करपेवाडी कृषी पर्यटन केंद्र
संपर्क - श्री. शेखर कर्पे
मु. पो. नागाव ,
ता. अलिबाग , जि. रायगड.
===================================

रत्नागिरी जिल्ह्यातील कृषि पर्यटन केंद्र संपर्क क्र माहिती


श्री सिद्धेश्वर कृषि पर्यटन केंद्र
संपर्क -श्री.संजय सुरेश पाथरे
मु.पो.पूर्णगड ता. रत्नागिरी,
जि. रत्नागिरी .
मो.नं. :-०२३५२-२३९२१२, ८६९८८९९२६६, ७०३८८०५४४४, ९४२२४३३६३६
ई.मेल :- spathre46@gmail.com

वृंदावन कृषि पर्यटन केंद्र
संपर्क -सौ :- वृंदा श्रीकांत दात्ये
मु.पो.धाउलवल्ली पो. पारवाडी ता.राजापूर,
जि. रत्नागिरी .
मो.नं. :-०२३५२-९२२५५२२३१५, ०२०-२४४७०१२७

मातोश्री कृषि पर्यटन केंद्र
संपर्क -सौ . माधवी माधव बेलोसे
मु.पो. कसबा नातू नगर पोस्ट ऑफिस शेजारी,
ता. खेड, जि. रत्नागिरी .
मो.नं. :- ८६५२७७८४२३, ९८२३६५०२०५, ९१६७७५९६०८

वृक्षवल्ली कृषि पर्यटन केंद्र
संपर्क -श्री. सागर विजय जठार
मु.पो. रेहळेभागाडी , कान्हेरे वाडी,
ता. चिपळूण, जि. रत्नागिरी .
मो.नं. :- ९०११६८३३२८, ९२७१२५३०११
ई.मेल :- jatharsagar@gmail.com

मधुसंचय कृषि पर्यटन केंद्र
संपर्क -मधुरा सुधाकर प्रभुदेसाई
मु. सडवे पो.कोळवांदे ता. दापोली,
जि.रत्नागिरी .
मो.नं. :-९४२२०८७०७०, ९९२२५८७०७०
ई.मेल :- madhura.2510@gmail.com

माझ्या मामाचा गाव
संपर्क -श्री. संकेत साळवी
आपट्याचे खोरे, पो. मुंडर,
ता. गुहागर, जि.रत्नागिरी .

गणेश कृषी पर्यटन केंद्र
संपर्क -श्री. गणेश रानडे
मु. पो. नाटे ,
ता. राजापूर , जि. रत्नागिरी - 415806.

औदुंबर कृषी पर्यटन केंद्र
संपर्क -श्री. महादेव जयराम पवार
मु.पो. भांबेड ता.लांजा,
जि.रत्नागरी
मो.नं. :-०२३५१- ६८५८०४, ९२०९९३३५४१

मल्हार कृषी पर्यटन केंद्र
संपर्क - मल्हार पर्यटक निवास केंद्र
मु. पो. ता. मंडणगड , जि.रत्नागिरी
.
अमृततेज निसर्ग सहवास
मु. पो. गव्हे ,
ता. दापोली , जि.रत्नागिरी - 415712.

गारवा कृषी पर्यटन केंद्र संपर्क-
आबलोली ,
ता. गुहागर, जि. रत्नागिरी.

साई मेरु कृषी पर्यटन केंद्र
संपर्क-श्री. नित्यानंद झगडे
मु. पो. असगोली ,
ता. गुहागर, जि.रत्नागिरी.

शारदा कृषी पर्यटन केंद्र
मु. पो. आंबवली , संभाजी नगर ,
ता. खेड , जि.रत्नागिरी.

केळकर वाडी कृषी पर्यटन केंद्र
संपर्क - श्री. प्रमोद श्रीकृष्ण केळकर
भगवती नगर, निवेंडी-गणपतीपुळे ,
जि. रत्नागिरी. .

संपर्क- श्री. प्रभाकर विनायक जोशी
शेत घर क्र 299, मौजे शेडवई , मु. पो.घराडी ,
ता. मंडणगड, जि.रत्नागिरी - 415203

मधुसंचय कृषी पर्यटन केंद्र
संपर्क- मधुरा सुधाकर प्रभुदेसाई
मु.सडवे, पो.कोळवाई ,
ता.दापोली , जि.रत्नागिरी - 415712

मधुग्राम कृषी पर्यटन केंद्र
संपर्क- मधुरा सुधाकर प्रभुदेसाई
मु.शिवाजीनगर, पो.दापोली ,
ता.दापोली , जि.रत्नागिरी - 415712
मो.नं. :-९४२२०८७०७०, ९९२२५८७०७०
ई.मेल :- madhura.251०@gmail.com

==========================

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषि पर्यटन केंद्र संपर्क क्र माहिती


स्पाईस व्हिलेज
संपर्क -श्री. भाऊ सामंत
घुमडेगाव, कुंभार मठ
ता. मालवण , जि. सिंधुदुर्ग .

चिवार टेकडी कृषी पर्यटन केंद्र
संपर्क - सौ. अमृता अशिष पाडगावकर
नंदन फार्म चिवार डोंगरे रोड
मु. पो.चराटे ,ता. सावंतवाडी , जि. सिंधुदुर्ग 416510.

प्रभु सृष्टी प्रभू कुंज कृषी पर्यटन केंद्र
रेवडी वाडी नेरुर वालावल रोड , कुडाळ
जि. सिंधुदुर्ग .

चिपि कृषी पर्यटन केंद्रसंपर्क -
कुडाळ वालावल मार्गे , परुळे रस्ता ,
मु. पो. परुळे , ता. वेंगुर्ला , जि. सिंधुदुर्ग .

डिंगणे कृषी पर्यटन केंद्र
डिंगणे गाव , सावंतवाडी ,
जि. सिंधुदुर्ग

कल्पतरू कृषी पर्यटन केंद्र
संपर्क -श्री.बाळासाहेब परुळेकर
सागरेश्वर मंदिर रोड ,उभादांडा, वेंगुर्ला,
जि. सिंधुदुर्ग - 416516.

INDRAPRASTH AGRO TECH PRIVATE LIMITED



महाराष्ट्रातील कृषि पर्यटन केंद्र संपर्क क्र. माहिती l पुणे विभागातील कृषि पर्यटन केंद्र संपर्क क्र. माहिती

महाराष्ट्रातील कृषि पर्यटन केंद्र संपर्क क्र. माहिती
पुणे विभागातील कृषि पर्यटन केंद्र संपर्क क्र. माहिती


तिकोणा पिकनिक कृषि पर्यटन केंद्र
संपर्क - श्री. सुरेश गोविंद मराठे
मु.पो. काशिग ता. मुळशी
पौड कोळवण लोणावळा रोड
ता. हाडशी , जि. पुणे.
मो.नं. :- ९८२३४०७७००, ८८८८१०३१२२, ९९२१२५६६६२

चारंगबाबा कृषि पर्यटन केंद्र
संपर्क - श्री. शिवाजी कारभारी गाजरे
मु. पो.जांबूत ता. शिरूर,
जि. पुणे.
मो.नं. :- ९८५०९६७४२६

ई.मेल :- gajareshivaji1@gmail.com
गारवा कृषि पर्यटन केंद्र
संपर्क -सौ. संगिता मनोहर वाटाणे
मु.पो. कोंढावळे ता. मुळशी,
जि. पुणे.
मो.नं. :- ९७६४८८०७४०, ७७९८९२८०८४
ई.मेल :- manoharvatane@gmail.com

ओम शिव स्वराज्य कृषि पर्यटन केंद्र
संपर्क -श्री. शिवाजी नामदेव निंबाळकर
मु. गहुंजे पो. देहू-रोड,
ता. मावळ, जि. पुणे.
मो.नं. :- ९८२३७८०१०१, ८७९३९८९८८८

अजिंक्य कृषि पर्यटन केंद्र
संपर्क -श्री. शिवाजी नामदेव निंबाळकर
मु. पो. गट.नं. ३७/२/१/ साईव खुर्द,
ता. मुळशी, जि. पुणे.
मो.नं. :- ९८८११८५५११, ९८२२४०८१६९

जय मल्हार कृषी पर्यटन केंद्र
चिंचोली मोराची
संपर्क - श्री.देवराम बबनराव गोरडे
चिंचोली मोराची,ता. शिरूर,
जि. पुणे.
मो. नं. :- ९८२२३४९३३३, ९८५०४२४२५१
ई.मेल :- jaymalhar1111@rediffmail.com
वेबसाईट :- www.morachichincholi.com

स्वामी समर्थ कृषि पर्यटन केंद्र
संपर्क -श्री. राजेंद्र चंद्रकांत मारणे
मु. पो. खारवडे ता. मुळशी,
जि. पुणे.
मो. नं. :- ९९२२४१९२४४
ई.मेल :- rajendramarne@yahoo.com

सोनजाई अॅग्री टुरिझम सेंटर
संपर्क - सौ. रोहिणी शरद गडसिंग
मु. पो. माजगांव (गट नं. 97),
ता. मुळशी जि. पुणे.
मो. नं. :- ७७९८८५४५५५, ७७९८७७३३३३
ई.मेल :- hsgadsig@gmail.com

गो. अॅग्री टुरिझम सेंटर
संपर्क -श्री. मकरंद मेघशाम अनगळ
सर्वे नं. २८६ मु. पो. कोलंबी,
ता. वेल्हा जि. पुणे.
मो. नं. :- ९९२२०१९२२२
ई.मेल :- makarand@goholiday.in

औदुंबर फार्म कृषि पर्यटन केंद्र
संपर्क -श्री. नंदकुमार शंकरराव जाधव
सर्वे नं. ५२/१ मु. केमसेवाडी , पो. जवळगाव,
ता. मुळशी जि. पुणे.
मो. नं. :- ९२२६४३३२७४, ८७९६९३८७७५

पर्णकुटी कृषि पर्यटन केंद्र
संपर्क -श्री. मंदाकिनी तुकाराम वायकर व श्री. शेखर ज्ञानेश्वर नलावडे
मु. पो. पिंपळवंडी ता. जुन्नर,
जि. पुणे.
मो. नं. :- ९८९०३२१४००, ९९६७९१०४७७
ई.मेल :- deepak06222@gmail.com
वेबसाईट :- www.parnakutiAgrotourism.com

गोधाम कृषि पर्यटन केंद्र
संपर्क -श्री. नितीन विष्णू घोटकुले
गोधाम मु. पो. आठले बु. || ,
ता. मावळ जि. पुणे.
मो. नं. :- ९९६००२१११४, ९५४५६८५७२५
ई.मेल :- Nitin_Niki@rediffmail.com

देवराई फार्मस अॅन्ड अॅग्रो टुरिझम
संपर्क -श्री. जितेंद्र श. मुळे
मु. तेलवडी पो. कासुर्डी,
ता. भोर जि. पुणे.
मो. नं. :- ९८५०२४२९२१, ९८२२२७३७३१
ई.मेल :- Nitin_Niki@deoraifarms@gmail.com, mulayjitendra@gmail.com

गोधाम कृषि पर्यटन केंद्र
संपर्क -श्री. नितीन विष्णू घोटकुले
गोधाम मु. पो. आठले बु. || ,
ता. मावळ जि. पुणे.
मो. नं. :- ९९६००२१११४, ९५४५६८५७२५
ई.मेल :- Nitin_Niki@rediffmail.com

“ मायभूमी ” कृषि पर्यटन केंद्र
संपर्क -श्री. कुशल राकेश बेद
ता. जुन्नर जि. पुणे,
मु.पो. कुसेगांव,(वाघदरा)
ता. दौंड,जि. पुणे. ऐश्वर्या फार्म कृषि पर्यटन केंद्र
संपर्क -श्री. प्रशांत दत्तत्रय वेताळ
पौड-मुळशी रोड, कोंढावळे गाव ,
मो. नं. :- ८३९०९०३३८४
ई.मेल :- kushalbedh@gmail.com

“ शंभूराजे ” कृषि पर्यटन केंद्र
संपर्क -श्री. लक्ष्मण काळूराम जगताप
मु. पो. तुळापुर, ता. हवेली, जि. पुणे
मो. नं. :- ९७६३०२१४०५, ९१३०१९००९३

आरोग्यम् कृषि पर्यटन केंद्र
संपर्क -श्री. अनंत दिगंबर झांबरे
मु. होळकरवाडी झांबरे पाटीलनगर,
ता. हवेली जि. पुणे
मो. नं. :- ९८२२०२०९३५, ९७३००६८९२३
ई.मेल :- aarogyampune@gmail.com
वेबसाईट :- www.aarogyampune.com

करंदीव्हॅली अॅग्रो टुरिझम सेंटर
संपर्क -श्री. विलास रघुनाथ बोरगे
मु. पो. करंदी (खे.बा),
ता. भोर जि. पुणे.
मो. नं. :- ९४२२५५२९१७, ९९२३५५९००८
ई.मेल :- vilasraoborge@gmail.com, karandivalley@gmail.com

पानशेत व्हॅली कृषि पर्यटन केंद्र
संपर्क -शश्री. अर्जुन बोबडे
मु. पो. आंबेगाव खुर्द ता. वेल्हा,
जि. पुणे.
मो. नं. :- ९८२२८१४१०१, ९०४९९५९६९२
ई.मेल :- assne@ymail.com

आमंत्रण कृषि पर्यटन केंद्र
संपर्क -श्री. शशिकांत सावळेराम जाधव, सौ. कविता शशिकांत जाधव
मु. गाळेगाव (साई मंदिर जवळ),
मु.पो. जुन्नर , जि. पुणे
मो. नं. :- ९९७५५४९३१९, ९५५२९७६२१३
ई.मेल :- shashikantjadhv778@gmail.com
वेबसाईट :- www.aamantranagritourism.com

गिरीवन कृषि पर्यटन केंद्र संपर्क -श्री. जयंत म्हाळगी व तेजस म्हाळगी
मु. डोंगरगाव पो. कोळवण,
ता. मुळशी जि. पुणे
मो. नं. :- ०२०-६५२०५५५०, ८८०५५४८०८०, ९८२२६५७६३१, ९९२२९३०७५०
ई.मेल :- girivanpicnics@gmail.com
वेबसाईट :- www.girivanpicnic.net

विश्वास कृषि पर्यटन केंद्र
संपर्क -श्री. धनंजय बाळासाहेब पोकळे व कुणाल नामदेव पासलकर
मु. पो. आडमाळ ता.मुळशी
जि. पुणे
मो. नं. :- ९४२२००२८५७, ७५८८५९२९५०

नंदनवन विश्वास कृषि पर्यटन केंद्र
संपर्क -श्री. बाळासाहेब शिवाजी पोकळे
मु. पो. डोणजे, ता. मुळशी,
जि. पुणे
मो. नं. :- ९४२२००२८५७

रानवारा (मावळ) कृषि पर्यटन केंद्र
संपर्क -श्री. विजय राजाराम घरदाळे
मु.आंबेगाव, पो.पवनानगर,
ता. मावळ जि. पुणे
मो. नं. :- ८८०६२२७१७१, ९७६४४८३५१३

पवना कृषि पर्यटन केंद्र
संपर्क -श्री. अनंता कोंडीबा घरदाळे
मु. आंबेगाव पो. पवनानगर,
ता. मावळ जि. पुणे
मो. नं. :- ९८२३९७५७९०, ८३८९९५४९१९

किनारा कृषि पर्यटन केंद्र
संपर्क -श्री. संतोष दत्तात्रय घरदाळे
मु.आंबेगाव पो. पवनानगर,
ता. मावळ जि. पुणे
मो. नं. :- ९८२३५०६०४८, ९९२१४७७१६८

कृषिराज फार्म अॅन्ड अग्रो टूरिझम सेंटर
 संपर्क -श्री. सागर बाळासाहेब पिलाणे
मु.पो. दहीटणे, ता.दौंड,
जि. पुणे ४१२२०७
मो. नं. :- ८२७५६९८९९६, ९६८९४४२६५५, ८२७५६९८९९४, ९९२१८४२९९४

मैत्री कृषि पर्यटन केंद्र
संपर्क -श्री. गोरख भरत वांजळे
मु. पो. अगळंबे ता. हवेली जि. पुणे
मो. नं. :- ९३७३१३९१०५, ९८२२११०८०८
ई.मेल :- wangalegorakh2@gmail.com

घरकुल कृषि पर्यटन केंद्र
संपर्क -श्री.अशोक लक्ष्मण चौगुले
मु. वातुंडे पो. कोळावडे
ता.मुळशी जि. पुणे
मो. नं. :- ८३०८३०९७७८, ७४४८१३८५५७, ९८८१०२५५३५
ई.मेल :- chaugulekavita75@gmail.com
वेबसाईट :- www.gharkulagritourism.com

शेतकरी कृषि पर्यटन केंद्र
संपर्क -श्री. सुभाष किसन गोऱ्हे
मु. पो.ओसाडे ता. वेल्हे
जि. पुणे
मो. नं. :- ८६०५३५०७०७

दोस्ती कृषि पर्यटन केंद्र
संपर्क -श्री. संजय श्रीधर औटी
मु. पो. करंजाळे ता.जुन्नर
जि. पुणे
मो. नं. :- ८८७९०८८९९०, ८८७९०८८९९१
ई.मेल :- sunclgsanjoy@gmailgmail.com

वॉटरफ्रट कृषि पर्यटन केंद्र
संपर्क -श्री. हेमंत गंगाधर जोशी
मु.राजापूर पो. भोंगवली
ता. भोर जि. पुणे
मो. नं. :- ९०७५५८३३९९, ८४११०४७८६०
ई.मेल :- vakratundtours@yahoo.com

विराज कृषि पर्यटन केंद्र
संपर्क -श्री. राजेंद्र मारुती जोरी
मु. पो. मालखेड ता. हवेली
जि. पुणे
मो. नं. :- ८६०५३५२१२१, ९४२०१७००२१

रश्मी ग्रीनलॅंड कृषि पर्यटन केंद्र (रश्मी बाग)
संपर्क -श्री.रश्मीकुमार कृष्णकुमार अब्रोल
मु. पो. गोळेगाव ता. जुन्नर
जि. पुणे
मो. नं. :- ९४२२००००५४, ०२०-२५६७५४६६

फुलाई कृषि पर्यटन केंद्र
संपर्क -श्री. पांडुरंग दत्तात्रय वाव्हळ
मु.राजापूर पो. भोंगवली
जि. पुणे
मो. नं. :- ९८२२८६८०७२
ई.मेल :- Pandurangvavhal@gmail.com

स्वप्नसरोवर कृषि पर्यटन केंद्र (काशिग)
संपर्क -श्री. सुनील तुकाराम
टेमघरे
मु.पो.काशिग ता. मुळशी
जि. पुणे
मो. नं. :- ९६३७१०५४८८, ७०६६५४१२१२
ई.मेल :- suniltemghare@gmail.com

सिंहगड व्हॅली अॅग्रो टुरिझम सेंटर
संपर्क -श्री. रत्नाकर भिकाजी मुजुमले
मु.पो. कोंढणपूर ता. हवेली
जि. पुणे
मो. नं. :- ९१३०२९८८७९, ९८२३१४१४६५
ई.मेल :- mugumaleRatnakar@gmail.com

रानवडी कृषि पर्यटन केंद्र (आंबीगाव
)संपर्क -श्री. संतोष चंद्रकांत सुरगुडे
मु. आंबी ता. हवेली जि.पुणे (रानवडी)
आंबी फाटा गौरीशंकर फार्म
मो. नं. :- ८६०५५४७९४८
ई.मेल :- santoshsurgude72@gmail.com

शारदा कृषि पर्यटन केंद्र
संपर्क -सौ. शारदा घनराज क्षिरसागर
मु.पो. ताम्हणी ता. मुळशी,
जि. पुणे
मो. नं. :- ९९२३००४८४८, ९८२२०३६८५४
ई.मेल :- bhausaheb.kshirsagar@gmail.com

मोसे व्हॅली कृषि पर्यटन केंद्र
संपर्क -श्री प्रमोद पांडुरंग पासलकर
मु. मोसे बु. ता. वेल्हा जि. पुणे
जि. पुणे
मो. नं. :- ९७६७९८५१३८, ८४४६५६४५०३

शांतिवन कृषि पर्यटन केंद्र
संपर्क -श्री. जयंत रामचंद्र म्हाळगी
मु. मणेरवाडी पो. खानापूर
ता. हवेली जि. पुणे
मो. नं. :- ०२०-६५२०५५५०, ८८०५५४८०८०, ९८२२६५७६३१, ९०११०८५६४०
ई.मेल :- info@shantivanpicnic.net
वेबसाईट :- www.shantivanpicnic.net

आर्याबाग कृषि पर्यटन केंद्र
संपर्क -सौ. सिमा कल्याण तावरे
मु.पो. काटेवाडी, ता.बारामती,
जि. पुणे
मो. नं. :- ९९२२४१०१००

गप्पांगण कृषि पर्यटन केंद्र
संपर्क -श्री ओंकार अ. देशपांडे
मु.पो. पोळेकरवाडी, पो. डोणजे,
ता. हवेली. जि. पुणे
मो. नं. :- ९४२२०३१९१५
ई.मेल :- gappangan@gmail.com

राजलोक कृषि पर्यटन केंद्र
संपर्क -श्री. राजू नर्बदराव लोकरे
A२५/ गिरीवन प्रोजेक्ट मु. होतले,
पो. कोळवण , ता.मुळशी
जि. पुणे – ४१२१०८
मो. नं. :- ९७६६३७५१५५, ९४२२०३२७९४
ई.मेल :- rajlok.girivan@gmail.com

लोणावळा कृषि पर्यटन केंद्र
संपर्क -शश्री. सुधीर सुधाम धडवले आणि श्री दिपक बबन मालपोटे
घर नं. ६०, मु. वाडिवळे, पो. टाकवे,
ता.मावळ, जि. पुणे.
जि. पुणे – ४१२१०८
मो. नं. :- ९८५०२९४४४४, ९५५२००४४४४, ९८२३३५५२०९, ९८९००६५४९२
ई.मेल :- lonawalaagritourism@gmail.com

आनंदी जीवन कृषि पर्यटन केंद्र
संपर्क -श्री. जीवन जगन्नाथ हेंद्रे
मु.पो.पसुरे (तळजाई - वरपेवाडी),
ता.भोर , जि.पुणे
मो. नं. :- ९८९०९१६७६७, ८८०५८९४६६७
ई.मेल :- lifelinett@yahoo.com

दुर्वांकूर फार्म कृषि पर्यटन केंद्र
संपर्क-डॉ. लक्ष्मण विजय भवारी
मु. पो. तेरुंगण,
ता.आंबेगाव, जि. पुणे.

सह्याद्री कृषी पर्यटन केंद्र
संपर्क - श्री. बाळासाहेब बबनराव बराटे
मु. बहुली,पो. सांगरुण,
ता.-हवेली, जि. पुणे.
मो.नं. :- ९६३७३८५७५६, ९७६४७०५३२८
ई.मेल :- sahyadriagri@gmail.com
sahyadriagri@gmail.com

बापूज कृषी पर्यटन केंद्र
संपर्क - श्री. विजयराव मल्हारराव झोळ
मु. पिंपळोली,पो. रिहे,
ता.-मुळशी, जि. पुणे.
मो.नं. :- ९७६२०३०८३०
ई.मेल :- bapusagri@gmail.com
वेबसाईट :- www.bapusagri.in

करण कृषी पर्यटन केंद्रसंपर्क - श्री. रमेश संकपाळ
रांणजणगांव गणपती,भांबर्डे रोड,
मु.पो. भांबर्डे,
ता.-शिरूर, जि. पुणे.

ऋतुपर्ण फार्म ग्रामिण कृषि पर्यटन केंद्र
संपर्क - सौ.स्वाती वसंत पवार
मु.पो. भादस, शिळेश्वर,
ता. मुळशी, जि. पुणे.
मो. नं. :- ९५४५५५०६९, ९८५०५६२००१
वेबसाईट :- swativpawer@yahoo.com

अॅंग्री कल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संपर्क -
अॅंग्री अँड इको टुरिझम बारामती
मु.पो.शारदानगर,
ता. बारामती,जि.पुणे.

सृष्टी कृषी पर्यटन केंद्रसंपर्क - श्री. आनंत पवार
मु. आवारवाडी,ता. मुळशी,जि. पुणे.

कोंडाजीबाबा कृषी पर्यटन केंद्रसंपर्क - श्री. निवृत्ती जोरी
पो. माले,ता. मुळशी,जि. पुणे.

 विमल सरोवर कृषी पर्यटन केंद्र
संपर्क - श्री. प्रकाश शहा
मु.साई खुर्द,
ता. मुळशी, जि.पुणे.

मलठण कृषी पर्यटन केंद्र
संपर्क - श्री. मनीष नंदकुमार शिरोळे
मलठण ,
ता.शिरूर, जि.पुणे.

निरा व्हॅली कृषी पर्यटन केंद्र
संपर्क - श्री.प्रकाश पाटील
तळेकर वस्ती,भोर,जि. पुणे.

गिरीजा कृषी पर्यटन केंद्र
संपर्क - श्री. सुरेश तुकाराम सणस
मु. पो. नांदोशी,सणसवाडी,(किरकटवाडी)
ता. हवेली,जि.पुणे. मावळ कृषी पर्यटन केंद्र

संपर्क -
शेवती वसाहत,पो. पवनानगर,
ता. मावळ,जि.पुणे.

तोरणा टेन्टस कृषी पर्यटन केंद्र
संपर्क - श्री. विलास पाटील
मु.पो. लाशिरगाव(पाटीलसर),
ता. वेल्हा,जि.पुणे.

मुळशी कृषी पर्यटन केंद्र
संपर्क -श्री. रामचंद्र भूमकर
मु.पो. आंबवडे-पुणे घोटावडे रस्ता,
ता. मुळशी,जि.पुणे.

पराशर कृषी पर्यटन केंद्र
संपर्क-श्री. मनोज हाडवळे
मु.पो. राजुरी,
ता. जुन्नर,जि.पुणे.

विमल सरोवर कृषी पर्यटन केंद्रसंपर्क-
साई खुर्द,शहा फार्म हाऊस,
विरबाजी पासलकर पुतळा,
वारसगाव धरणावर बोटिंगजवळ,पानशेतगाव
ता. हवेली,जि.पुणे.

आरोग्यम कृषी पर्यटन केंद्र
संपर्क-
आरोग्य सहल केंद्र झांबरे पाटील नगर,
मु. पो. होळकरवाडी,
हांडेवाडी चौकाजवळ,
कात्रज-सासवड बायपास, पुणे.

डोंगर कुस कृषी पर्यटन केंद्र
संपर्क- कुरुंगवाडी गिरन वेल्हे रोड,
नसरापूरच्या पुढे 7 की.मी. वर
ता. भोर,जि.पुणे.

वनाई कृषी पर्यटन केंद्रसंपर्क-श्री. संतोष निंबारकर
निंबारकर मार्केट,1 ला मजला नं.3,
एस.टी. स्टॅंड समोर,
मु.पो.नारायणगाव,
ता.जुन्नर जि.पुणे.

अमृता ग्राम कृषी पर्यटन केंद्र
संपर्क-श्री. अनिल पवार
मु.पो.सारोळा,सावदरे
ता.भोर,जि.पुणे.
मो.नं. :- ८३०८४०५०५०, ९८५०६६५६५३
ई.मेल :- hotelamrutagarden@gmail.com
वेबसाईट :- www.hotelamrutagarden@gmail.com

नक्षत्रबाग कृषी पर्यटन केंद्र
संपर्क-श्री. उमेश वा. आठलेकर
मु. पो. सांडभोरवाडी
इंदिरा पाझर तलावाजवळ,राजगुरूनगर,
ता. खेड,जि. पुणे.
मो.नं. – ९८५०९५०१०८, ०२१३५-२२४८८८
ई.मेल :- aathlekar@gmail.com

आनंदी जीवन कृषि पर्यटन केंद्र
संपर्क-श्री. जीवन जगन्नाथ हेन्द्रे
मु. पो. पसुरे (तळजाई - वर्पेवाडी),
ता. भोर, जि. पुणे.

अमृतराई कृषि पर्यटन केंद्र
संपर्क-श्री. अपूर्व अनंत जोग
गट नं. 310, मौजे केतकावणे,
ता. वेल्हा, जि. पुणे.
मो.नं. – ९४२२००३४४८, ९४२२००३४४५
ई.मेल :- apoorva12@hotmail.com

प्रथमेश फार्म कृषि पर्यटन केंद्र
संपर्क-सौ. पोर्णिमा विनायक निंबाळकर
गट नं. 28, मु. पो. साळवडे ,
ता. भोर, जि. पुणे.

कोकणकन्या कृषि पर्यटन केंद्र
संपर्क-श्री. राहुलकुमार बाबासाहेब येवले
मु. पो. मुखई ,
ता. शिरूर, जि. पुणे.
मो.नं. – ९९२३४५७८९९, ९८२३०४७७५७
ई.मेल :- rahulkumaryewle@gmail.com
वेबसाईट :- www.kokanya.com

माउली कृषि पर्यटन केंद्र
संपर्क-श्री. जनार्दन ज्ञानोबा थोपटे
चिंचोली मोराची , ता. शिरूर,
जि. पुणे पिन कोड – ४१२२१८
मो.नं. – ९८२२६८९१७३, ९९६०६६३५३०
ई.मेल :- janardanthopte@gmail.com

जलसृष्टी कृषि पर्यटन केंद्र
संपर्क-मा. श्री. रामदास मुरकुटे , डॉ. लक्ष्मण कुलकर्णी
मु. पो. :- जामगाव ता. मुळशी,
जि. पुणे पिन कोड – ४१२२१८
मो.नं. – ९८२२००७०७१, ९४२२००६११०

मुळशी कृषि पर्यटन केंद्र
संपर्क-श्री रामचंद्र दगडू भूमकर
मु.पो. आंबेडवेट, पुणे – घोटावडे रस्ता,
ता. मुळशी जि. पुणे.
मो.नं. – ९८८१८३४०७२, ९८८१०१८७३४
वेबसाईट : www.mulshiagritourism.in
अभिनव कृषि पर्यटन केंद्र
संपर्क-श्री. संजय मुकुंद लेले
मु. गट नं. 276, मांडरेवाडी डोणजे ,
ता. हवेली, जि. पुणे.
मो.नं. :- ९८२२१७४९७४, ९८८१०९८७८७, ०२१३५-२२४८८८
ई.मेल :- dhammal324@gmail.com

नेचर नेस्ट कृषि पर्यटन केंद्र
संपर्क-श्री. चंद्रशेखर विनायक शितोळे
मु. पो. कोरेगाव मूळ ,
ता.हवेली, जि. पुणे.
मो.नं. :- ७७७५०२०९०९, ९९२२३४०६५३
ई.मेल :- chandrashekhar58@gmail.com

हिडन ओअसिस कृषी पर्यटन केंद्र
संपर्क - श्री. युनूस सिप चांदलर
गरांडे धरण,मु.पो. गराडे,
ता.-पुरंदर, जि. पुणे.

 “ईको व्हिलेज” जंगल स्टे
संपर्क-श्री.परिमल & श्री.रामराव
मो. नं. :- ९८५०६९६९६०, ९४०४७४०७३६
मु. पो. पाथरशेत , ता. मुळशी, जि. पुणे
मार्ग - पुणे ते लव्हासा
चांदणीचौक ते ईको व्हिलेज साधारण 57 कि. मी.
लवासा मेन गेट ते आडमाळ मेन गेट - तेथून पुढे.
आडमाळ नंतर पाथरशेत बोर्ड- राजबाग,
ईको व्हिलेज, मंगल स्टेशन.


INDRAPRASTH AGRO TECH PRIVATE LIMITED

forty.square1948@gmail.com