Saturday, 14 October 2017

महाराष्ट्रामध्ये शेती पर्यटन केंद्रांची संलग्नीकरण साठी मार्गदर्शक तत्वे ; कृषी पर्यटन केंद्रे ; अर्ज कुठे करायचा ? माहीतीसह

कृषी पर्यटन केंद्रे

शहरी वातावरणात वाढणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना आपण खातो त्या भाज्या कशा निर्माण होतात, फळांची झाडे कशी असतात, दूध कोठून मिळते याचबरोबर शेतीविषयक विविध बाबींबाबत मोठे कुतूहल असते. शेती हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. अनेक सण, उत्सव, परंपरा या शेती व्यवसायाशी निगडित आहेत. ग्रामीण शेती, संस्कृती, लोकजीवन, उत्सव, खाद्यसंस्कृती इत्यादींची शहरवासीयांना निसर्गरम्य वातावरणात ओळख व्हावी यासाठी कृषी पर्यटन उत्तम पर्याय ठरतो. ग्रामीण भागात कृषी पर्यटनाची मोठी संधी निर्माण झाली आहे. राज्यात विविध ठिकाणी कृषी पर्यटन केंद्रे उभारली आहेत.
शेती हा देशाच्या व राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कारण देशातील 70 टक्के तर राज्यातील 55 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या आपल्या चरितार्थासाठी थेट शेती व्यवसायावर अवलंबून आहे. महाराष्ट्र राज्यात असलेले जवळपास 82 टक्के कोरडवाहू क्षेत्र, 52 टक्के अवर्षणप्रवण क्षेत्र, 40 टक्के हलक्या जमिनीचे क्षेत्र, अनियमित पाऊस, अतिवृष्टी, अवर्षण, गारपीट, कृषी मालाच्या बाजार भावातील अनपेक्षित चढ-उतार, पायाभूत सुविधांची कमतरता यासारख्या विविध समस्या शेती व्यावसायिंकासमोर आहेत.
या पार्श्वभूमीवर शेती व्यवसायातून उत्पन्नात स्थिरता प्राप्त करण्याच्या दृष्टीने शेतकरी आतापर्यंत पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यशेती व विविध प्रकारचे कुटीरोद्योग करायचे. नव्या पिढीला मात्र शेतीविषयक विविध बाबींबाबत मोठे कुतूहल असते. शेती हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. अनेक सण, उत्सव, परंपरा या शेती व्यवसायाशी निगडित आहेत. अशा परिस्थितीत ग्रामीण शेती, संस्कृती, लोकजीवन, तेथील रुढी, परंपरा, उत्सव, जत्रा, खाद्यसंस्कृती, लोककला इत्यादी विविध बाबी पाहणे, त्यांची अनुभूती घेणे व आपल्या मुलांना त्याचा अनुभव देणे हे त्यांना आवडते. शहरी वातावरणात कंटाळलेले युवकयुवती देखील मनाला शांतता लाभावी, निसर्गरम्य वातावरणात जावे म्हणून देखील ग्रामीण भागातील असा अनुभव देणाऱ्या कृषी पर्यटन केंद्राच्या शोधात असतात.
या पार्श्वभूमीवर कृषी पदवी, अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन व इतर क्षेत्रातील अभ्यासक्रम पूर्ण केलेले अनेक युवक/युवतींनी शहरी भागातील ही गरज ओळखून राज्यात विविध ठिकाणी कृषी पर्यटन केंद्रे उभारली आहे.

महाराष्ट्रामध्ये शेती पर्यटन केंद्रांची संलग्नीकरण साठी मार्गदर्शक तत्वे
कृषी पर्यटनासंबधी मार्गदर्शक तत्वे


१) अर्ज कुठे करायचा ? माहीतीसह अर्ज पुढील पत्त्यावर समक्ष देता येईल :
अध्यक्ष
महाराष्ट्र अॅग्री अँण्ड रुरल टुरिझम को - ऑप. फेडरेशन लि.(मार्ट),पुणे
४३४, शुक्रवार पेठ, अनुश्री हाईटस् १ ला मजला,
शिवाजी रोड, पुणे -४११००२.

२)कृषी पर्यटन केंद्राने संलग्नीकरणसाठी अर्ज करताना पुढील नमुन्याप्रमाणे, योग्य त्या कागदपत्रांसह माहिती देणे आवश्यक आहे.
(अ) नमुना अर्ज: अॅनेक्शर I प्रमाणे,
(ब) सुख - सोयींची यादी, अॅनेक्शर II प्रमाणे,
(क) जाहीर निवेदन, अॅनेक्शर III प्रमाणे,
(ड) मान्यता : स्वीकारपत्र अॅनेक्शर IV प्रमाणे,
(इ) पोलिस तपासणी : अॅनेक्शर V प्रमाणे .

३)संलग्नीकरण फी रु. 5,000 + 5,000(तीन दिवसाच्या प्रशिक्षण शिबीरासाठी जे बंधनकारक आहे.)/- महाराष्ट्र स्टेट अॅग्री अँण्ड रुरल टुरिझम को - ऑप. फेडरेशन लि.(मार्ट),पुणे या नावे डिमांड ड्राफ्ट (पुण्यातील शाखेवर देय)काढून पाठवावी. किंवा रोख रक्कम थेट PDCC बँकेत, डेक्कन जिमखाना बी.आर. पुणे येथे जमा करावी. IFS CODE: HDFCOCPDCCB A/C No. 1/92.
४) कृषी पर्यटन केंद्राची संलग्नीकरण करण्यासाठी शेती पूर्णपणे विकसित झालेली असावी. तसेच ती शेती पर्यटकांना भेट देण्यास योग्य अशा ठिकाणी असली पाहिजे.
५) भाडयाने देण्यासाठी कमीत कमी ३ खोल्या असणे हे कृषी पर्यटन केंद्राची संलग्नीकरण करण्यासाठी बंधनकारक आहे.
६) करारपत्रावर सही झाली, की त्या तारखेपासून प्रथम ३ वर्षासाठी संलग्नीकरण होते. मार्ट संस्थेच्या तपासणी समितीने / पुनर्वालोकन समितीने शिफारस केली तर त्याची मुदत वाढवली जाऊ शकते. या संदर्भात व्यवसाय किती प्रमाणात वाढला आहे, पर्यटकांची संख्या, कृषी पर्यटन केंद्राची देखभाल इ. बाबींचा विचार करण्यात येतो.
७) पर्यटकांच्या भेटीचे रजिस्टर (नोंद) ठेवणे आणि त्यामध्ये पाहुण्यांचा अभिप्राय घेणे बंधनकारक आहे. हे रजिस्टर दर महिन्याला मार्ट संस्था, पुणे येथे पाठवणे बंधनकारक आहे.
८) कृषी पर्यटन केंद्रामध्ये पर्यटकांचा मुक्काम असताना कोणत्याही स्वरूपाचा अपघात झाला तर त्याला ताबडतोब वैद्यकीय मदत करणे आणि वाहन व्यवस्था करणे ही शेतकऱ्याची / कृषी पर्यटन केंद्राची जबाबदारी राहील. अशा प्रकारची जबाबदारी स्विकारण्याचे मान्यताप्राप्त (अॅफ़िडेव्हीट) शेतकऱ्याने संलग्नीकरण करतेवेळी देणे बंधनकारक आहे.
९) शेतकऱ्याविरूद्ध कोणत्याही स्वरूपाची तक्रार आली तर मार्ट संस्था संबधित केंद्राची संलग्नीकरण रद्द करण्याचा अधिकार मार्ट संस्थेला आहे.
१0) सोबतच्या सूचीप्रमाणे सुखसोयी आणि सेवांची उपलब्धता याबाबत तपासणी व मुल्यांकन केले जाईल. (सूची पूर्ण भरून आणि कागदांवर सही करून मार्ट संस्थेकडे सादर केलीच पाहिजे)
११) मार्ट संस्थेची समिती कृषी पर्यटन केंद्राची तपासणी करेल, आणि नंतर त्यांच्या संलग्नीकरणबाबत शिफारस करेल. त्यानंतर विशिष्ट कालावधीनंतर, वेळोवेळी देखरेख ठेवण्यासाठी तपासणी करण्यात येईल. त्यावरून केंद्राच्या प्रगतीचा अहवाल सदर केला जाईल.
१२) मार्गदर्शक तत्वे / अटी आणि नियम यामध्ये वेळोवेळी बदल करण्याचे हक्क मार्ट संस्थेने, स्वतःकडे राखून ठेवले आहेत.
१३) सर्व प्रकारचे दर आणि विविध कर (इलेक्ट्रिसिटी वीज, पाणी, स्थावर वास्तू आणि करमणूक इ. संदर्भात ) यांची सर्व आणि पूरक जबाबदारी शेतकऱ्याची असेल तसेच या सर्व जबाबदाऱ्या त्याने पूर्ण करणे आवश्यक आहे. ह्या जबाबदाऱ्यांबाबत मार्ट संस्था कोणत्याही प्रकारची सवलत / माफी देण्याविषयी आश्वासन देऊ शकत नाही.
१४) शेतकऱ्याने मार्ट संस्थेचे नाव किंवा बोधचिन्ह विदयुतपाटी (साईन बोर्ड ) कोणत्याही प्रकारे प्रदर्शित करू नये. तसेच छापील प्रसिद्धी पत्रके, रोखीच्या - चेकच्या पावत्या, लेटर हेड्स, रबर स्टेम्प्स इ. बाबींसाठी सुध्दा मार्ट संस्थेच्या नावाचा आणि बोधचिन्हचा वापर करू नये. या अटींचा भंग झाल्यास संलग्नीकरण / मान्यता रद्द होऊ शकते.
१५) मार्ट संस्थेकडून केंद्राला संलग्नीकरणचे प्रमाणपत्र देण्यात येईल. हे प्रमाणपत्र स्वागतकक्ष / कार्यालय येथील दर्शनी भागात लावल्यास हरकत नाही. तसेच विदयुत बोर्डावर (साईन बोर्डावर ) किंवा इतर छापील साहित्यावर मात्र 'मार्ट संस्था ' व्दारे संलग्नीकरणकृत " Registred With Mart " असा उल्लेख शेतकरी करू शकेल.
१६) शेतकऱ्याने दरपत्रकात कोणताही बदल केला असेल किंवा पर्यटनाच्या दृष्टीकोनातून काही नवीन योजनांचा समावेश केला असेल तर त्या सर्वांची माहिती मार्ट संस्थेला कळविली पाहिजे.
१७) कृषी पर्यटन केंद्र संचालकाने विहित नमुना अर्जाप्रमाणे (अॅनेक्शर -V) पोलिस पडताळणी अहवाल (रिपोर्ट) सदर करणे बंधनकारक आहे.
१८) सरकारसंबधी खात्याचे/ प्रतिनिधी कंपन्यांचे नियम आणि अटी यांची काटेकोर अंमलबजावणी शेतकऱ्याने केलीच पाहिजे. कोणत्याही नियमांचा किंवा मार्गदर्शक तत्वांचा कोणत्याही प्रकारे भंग होणार नाही याची शेतकऱ्याने काळजी घ्यायला हवी. त्या संदर्भात धोरणात्मक भंग होणार नाही याची शेतकऱ्याने काळजी घ्यायला हवी. त्या संदर्भात धोरणात्मक भंग झाल्याचा परिणाम म्हणून जर त्या खात्यामार्फत कोणतीही कारवाई झाली तर तिला तोंड देण्याचे (सामोर जाण्याची ) पूर्ण जबाबदारी ही संबधित शेतकऱ्याची असेल.

१९) सोबत कागदपत्रे खालीलप्रमाणे आवश्यक
१) शेतजमिनीचा ७/१२ उतारा अथवा करारनामा
२) ग्रामपंचायत ना हरकत दाखला
३) पोलिस पाटलांचा दाखला.


अधिक माहितीसाठी संपर्क - INDRAPRASTH AGRO TECH

forty.square1948@gmail.com


कृपया संलग्नीकरण खालील फॉर्म भरा








 
अधिक माहितीसाठी संपर्क - INDRAPRASTH AGRO TECH

forty.square1948@gmail.com

कृषी पर्यटन केंद्रातील रेलचेल

बहुतांशी कृषी पर्यटन स्थळांमध्ये काही ग्रामीण वैशिष्ट्यांचा समावेश असतो. उदा.ग्रामीण लोककलांमध्ये भारुड, गोंधळ, जागरण, कीर्तन, वासुदेव, गारुड्याचा खेळ, डोंबाऱ्यांचा खेळ, लेझीम खेळणे इत्यादींचे प्रात्यक्षिक दाखवले जाते. पिकांमध्ये भात, बाजरी, गहू, मका, ज्वारी, तूर, मुग, उडीद, भुईमूग इत्यादी पिकांची लावणी, व्यवस्थापन, काढणी व वितरण बाबत माहिती, प्रत्यक्ष कार्यानुभव दिला जातो. याशिवाय हरितगृह, रोपवाटिका, आंबा, काजू, संत्रा, मोसंबी, द्राक्ष इत्यादी फळपिकांची लागवड, व्यवस्थापन, काढणी, प्रक्रिया व विपणनबाबत तसेच दुग्धव्यवसाय, पशूपालन, कुक्कुटपालन याबाबत माहिती व प्रत्यक्ष कार्यानुभव दिला जातो. नदी, ओढे, विहीर, शेततळे यामध्ये पोहणे इत्यादी साहस अनुभवता येते. याशिवाय स्थानिक हस्तकला-सुतार, लोहार, कुंभार, कोष्टी इत्यादी, साहसी पर्यटन संधी, स्मारके भेट, पक्षी निरीक्षण, धरणे, जलक्षेत्र, धार्मिक श्रद्धास्थाने, ऐतिहासिक किल्ले, गुंफा भेटी, द्राक्ष महोत्सव, फळपीक महोत्सव, धान्य महोत्सव भेटी, आठवडे बाजार, वाईनरी, गुऱ्हाळ, मधुमक्षिका प्रकल्प भेट, ग्रामीण जेवणाचा स्वाद-चुलीवर पिठलं, भाकरी, ठेचा, चपाती, चटणी, लोणची, दही, दूध, ताक, वांगे भरीत, हुरडा याची चव घेता येते. ग्रामीण यात्रा, महोत्सव, जत्रांमध्ये सहभाग नोंदवता येतो. ग्रामीण खेळांमध्ये सहभाग-बैलगाडी, ट्रॅक्टरमधून सफारी, घोड्यावरून रपेट, विटी-दांडू, हुतुतू, आट्या-पाट्या, गोट्या, सूरपारंब्या इत्यादी खेळांची ओळख करुन दिली जाते.

काही वैशिष्ट्यपूर्ण कृषी पर्यटन केंद्रे

1. पराशर कृषी पर्यटन केंद्र - राजुरी, ता.जुन्नर, जि.पुणे येथे मनोज हाडवळे या फलोत्पादन शाखेतील पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या तरुणाने ऋषी पराशर या कृषिविषयक पहिला ग्रंथ लिहिणाऱ्या ऋषींच्या नावे हे पर्यटन केंद्र सुरु केले आहे. याठिकाणी एका वेळेस 40 हून अधिक पर्यटकांची निवास सुविधा असून द्राक्ष, डाळिंब, वनपर्यटन, आठवडी बाजार, दुग्धव्यवसाय, डेअरी, लोककला व मासवडी-भाकरी सारखे पाटावर बसून घ्यावयाचे जेवण अशा विविध बाबी येथे उपलब्ध आहेत. मुंबईपासून साधारणत: 150 व पुणे-नाशिकपासून 110-120 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. (संपर्क : www.hachikotourism.in)

2. सगुणा बाग – नेरळ (ता.कर्जत,जि.रायगड) येथे चंद्रशेखर भडसावळे या कोकण कृषी विद्यापीठातून कृषीविषयक शिक्षण घेतलेल्या व अमेरिकेत जाऊन काही काळ काम केलेल्या कृषी पदवीधराने जवळपास 1995-96 मध्ये हे कृषी पर्यटन केंद्र सुरु केले आहे. या ठिकाणी शेततळ्यांमधील मत्स्यपालन, भातशेती, नारळ, आंबा, चिकूसारखी फळपिके आणि शेतीविषयक विविध भाजीपाला व इतर पिकांची लागवड आहे. या ठिकाणी ग्रामीण खेळांचा अनुभवदेखील आपण घेऊ शकतो. या पर्यटन केंद्रावर तळ्यामध्ये असलेले घर ही वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण येथून जेमतेम 15 ते 20 किमीपर्यंत आहे. आपण नेरळपर्यंत मुंबईहून लोकल रेल्वेने जाऊ शकतो. तेथून जेमतेम 6 किमी अंतरावर असलेल्या सगुणा बागेत प्रवाशांची नेण्या-आणण्याची व्यवस्था आहे. (संपर्क – www.sagunabaug.com)

3. तापोळा कृषी पर्यटन शेतकरी व्यावसयिक कंपनी – गणेश उत्तेकर व काही युवा प्रयोगशील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तापोळा या कोयना बॅक वॉटर असलेल्या महाबळेश्वर नजीकच्या ठिकाणी कृषी पर्यटन व्यावसायिक शेतकऱ्यांची कंपनी स्थापन केली आहे. या ठिकाणी कंपनीतील सभासद शेतकरी हे पर्यटकांचे राहणे, भोजन व स्थानिक कृषी पर्यटनाची सोय करतात (संपर्क : www.tapolatourism.com)

4. आनंद कृषी पर्यटन केंद्र - बोरगाव, (ता.जि.सातारा) येथे आनंद शिंदे या प्रयोगशील शेतकऱ्याने हे केंद्र उभारले असून या ठिकाणी मुलांसाठी रेनडान्स, लॉनवरील खेळ, साहसी क्रीडाप्रकार इत्यादी अनेक सुविधा आहेत. या ठिकाणी पाचगणी येथील शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहली ग्रामीण कार्यानुभवासाठी मोठ्या प्रमाणावर भेटी देतात. (संपर्क : www.anandagriturism.com)

5. पळशी कृषी पर्यटन केंद्र - पांडुरंग तावरे यांनी राज्यातील विविध कृषी पर्यटन व्यावसायिकांना कृषी पर्यटन विकास संस्थेच्या माध्यमातून एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कृषी पर्यटनात केलेल्या कामाबद्दल त्यांना राष्ट्रीय पर्यटन पुरस्कारासह अनेक देशांचे विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी उभारलेले पळशीवाडी (ता.बारामती, जि.पुणे) येथील पर्यटन केंद्र शहरी पर्यटकांची नाळ ग्रामीण भागाशी जोडण्याचे काम करत आहे.(संपर्क : www.agritourism.in)

6. एक अलौकिक अनुभव – कृषी पर्यटनातून मोठ्या प्रमाणात व्यावसायिक संधी निर्माण झाल्या असून राज्यात आजमितीस जवळपास 210 हून अधिक कृषी पर्यटन केंद्रात दरवर्षी जवळपास 8 लाखाहून पर्यटक भेटी देत असतात.

अधिक माहितीसाठी संपर्क - INDRAPRASTH AGRO TECH

forty.square1948@gmail.com


No comments:

Post a Comment